Pimpri News : तरुणाला विनाकारण दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न

तिघांना अटक

0

एमपीसी न्यूज – कामावरून घरी जात असलेल्या तरुणाला तिघांनी मिळून विनाकारण दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री एच ए मैदानाजवळ नेहरूनगर पिंपरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

श्रीकांत रावसाहेब बेरड (वय 28, रा. वानवडी, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजिंक्य रामदास नेटके (वय 24, रा. नेहरूनगर पिंपरी), फिरोज करिम मुजावर (वय 26), गाॅडफ्रे सायमन डिसूझा (वय 25, रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ड्युटी वरून मासुळकर कॉलनी येथे जात होते. त्यावेळी एच ए मैदानाच्या शेजारी सार्वजनिक रोडलगत काही मुले मारामारी करत होती. त्यामुळे फिर्यादी यांनी गाडी थांबवली.

त्यानंतर मारहाण करणाऱ्या मुलांनी फिर्यादी यांना गाडीवरून खाली ओढले. जीवे मारण्याच्या उद्देशाने रस्त्यावरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी दगड हुकवला. मात्र यात त्यांच्या पायाला जखम झाली. एकाने त्यांना दगडाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment