Pimpri News: काँग्रेस शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे राजीनाम्यावर ठाम राहिल्याने  काँग्रेसने नवीन शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु केली आहे.  शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या उद्या (मंगळवारी) मुलाखती होणार आहेत.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व पिंपरी-चिंचवड निरीक्षक राजेश शर्मा आणि नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड निरीक्षक शरद आहेर हे मंगळवारी (दि. 24) दुपारी 11 ते 2 या वेळेत निगडी प्राधिकरण येथील हरीदास नायर यांच्या कार्यालयात (सेक्टर 27, ॲक्सिस बँक जवळ) इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या पदाचा 11 नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. राजीनामा मागे घेण्यास साठे यांनी नकार दिल्यामुळे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणा-यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

मुलाखतीसाठी इच्छुकांनी व शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिन साठे यांनी केले आहे. तसेच यावेळी कोरोना – कोविड -19 बाबत सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर पाळावे, सॅनिटायझर वापरावे सर्व नियमांचे पालन करावे असेही आवाहन साठे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.