Pimpri: खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा- मनिषा पवार

tuition fees waiver of private school students of pimpri demand by Manisha Pawar

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी शिक्षण समिती सभापती मनिषा पवार यांनी केली आहे.

याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नावर झाला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.

खासगी नोकरदार, व्यवसाय करणारे नागरिक, रोजंदारीवर काम करणारे मजूर आदी लोकांना उत्पादनात घट झाल्यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. त्यांना उदरनिर्वाह करणे देखील अडचणीचे होत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.