Tukaram Maharaj : बागेश्वर महाराजांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी

एमपीसी न्यूज : संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) आणि त्यांच्या पत्नीबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता बागेश्वर महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यामध्ये आपले शब्द मागे घेतो असे स्पष्टीकरण दिले आहे. संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून महाराष्ट्रात बागेश्वर महाराजांनी माफी मागावी अशी मागणी होत होती. 

बागेश्वर महाराज म्हणाले, की संत तुकाराम महाराज हे महान संत होते. ते माझ्यासाठी आदर्श आहेत. एका कथेत मी त्यांच्या पत्नीबद्दल ज्या भावना मी व्यक्त केल्या त्या मी एका पुस्तकात वाचल्या होत्या. त्या भावना फक्त मी माझ्या शब्दांत प्रस्तुत केल्या. यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो आणि त्यासाठी मी क्षमा मागतो.

Pune News : पुण्यातील आप्पा बळवंत चौकात एकावर कोयत्याने वार

बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कुमार शास्त्री यांनी आपल्या प्रवचनात (Tukaram Maharaj) तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी यांच्याबद्दल विधान केले होते. हा दाखला चुकीचा असल्याने वारकरी संप्रदायाने आक्रमक भूमिका घेतली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.