Pimpri : तुकोबांची पालखी परतली; पिंपरीत मुक्काम 

एमपीसी न्यूज – आषाढीवारीकरुन पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामासाठी आज (मंगळवारी)पिंपरीगावात पोहचली. टाळ-मृदंगाच्या गजरात शहरवासीयांनी पालखीचे स्वागत केले. तुकोबांची पालखी उद्या (बुधवारी)देहूत परतणार असून पालखी सोहळ्याचा प्रवास पूर्ण होणार आहे. 

तुकोबारायांची पालखी पुण्यातील मुक्काम आटोपून सकाळी सहा वाजता पिंपरीकडे मार्गस्थ झाली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखी पिंपरीगावात पोहचली. मुख्य चौकात जोग महाराज प्रासादिक दिंडीच्या वतीने वारक-यांना अन्नदान करण्यात आले. महापौर राहुल जाधव, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखी सोहळा प्रमुख सुनिल मोरे व दिंडी प्रमुखांचा सत्कार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत सोहळ्याला रमेश वाघेरे, अरुण साठे, प्रवीण मुथ्था, आनंद आगरवाल, रामभाऊ पाडाळे, नामदेव नाणेकर, ख्वाजाभाई कुरेशी, सुरेश घोरपडे, महादेव गुंजाळ आदी उपस्थित होते.

पालखीने पाउणतास पिंपरीत विसावा घेतला. या वेळी रमेश वाघेरे आणि मित्रपरीवाराच्या वतीने बुंदी, बिस्किट, चहा तसेच फळवाटप करण्यात आले. पाउणतासाच्या विसाव्यानंतर पालखीने पिंपरीगावाकडे प्रस्थान केले. पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिर येथे पालखी मुक्कामाला राहणार असून बुधवारी सकाळी सात वाजता चिंचवड गावाकडे मार्गस्थ होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.