Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराचा तो निर्णय अखेर मागे

एमपीसी न्यूज –  मंदिर परिसरात तोकडे कपडे किंवा ठराविक वेशभूषेला बंदी घातल्याचा निर्णय श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने मागे घतले आहे. त्यांनी काल (गुरुवारी) मंदिर परिसरात (Tuljabhavani Temple) तसे फलक लावले होते. मात्र  निर्णयावर टिकेची झोड उडाल्यानंतर काही तासात  संस्थानाने तो निर्णय मागे घेत  तसे जाहीर स्पष्ट केले  आहे.

सायंकाळी मंदिर संस्थानाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी याबाबतचे जाहीर प्रकटन काढले आहे. तुळजाभवानी मंदिरात दर्शन अथवा पूजेसाठी येणाऱ्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आले आहे.मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेदारी आणि भाविक तसंच भक्तांना कळवण्यात येते की, श्री तुळजा भवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे स्पष्टीकरण संस्थानाने दिले आहे.

Accident : उर्से टोल नाक्याजवळ पहाटेच्या सुमारास कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

मंदिर परिसरात अचानक ड्रेसकोड बाबत चे फलक झळकल्याने भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर संस्थानाच्या वतीने एक नियमावली जाहीर केली गेली होती. अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावले आहेत. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा. मात्र यावरून वाद सुरु झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये स्पष्टीकरण देत असा कुठलाही ड्रेसकोड मंदिरात येण्यासाठी नसल्याचं मंदिर समितीने म्हटलं (Tuljabhavani Temple) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.