Tuljapur News: तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस आजपासून प्रारंभ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज (प्रमोद राऊत) – श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय  नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस आज (शुक्रवार) रात्रीपासून प्रारंभ होत आहे.  आई भवानीची ही मंचकीनिद्रा शनिवार दि. 17 ऑक्टोबरपर्यंत नऊ दिवस चालणार आहे.

आज (शुक्रवार) सांयकाळी अभिषेक पूजेची घाट होणार आहे. नंतर देवीस अभिषेक घालण्यात आल्यानंतर सिंह गाभाऱ्याशेजारी असणाऱ्या शेज घरातील चांदीच्या पलंगावर निद्रस्त केली जाणार आहे. देवीच्या मंचकीनिद्रा कालावधीत देवीस सुगंधी तेल, अभिषेक घातले जातात.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.