Turkey Earthquake : भूकंपाने टर्की हादरले! भूकंपात 1300 जणांचा मृत्यू,भारत सरकार करणार टर्की देशाची मदत

एमपीसी न्यूज : सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास टर्कीमध्ये तब्बल 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात टर्की आणि सिरियामध्ये 1300 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. तर जखमींची संख्या सहा हजार 400 पेक्षा जास्त आहे. या भूकंपात जीवितहानीसोबतच मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Turkey Earthquake) या दुर्घटनेमुळे जगभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. दरम्यान, भारत सरकार टर्की देशाची मदत करण्यासाठी रेस्क्यू टीम पाठवणार आहे. तसेच भूकंपग्रस्त लोकांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, तसेच अन्य सामान पाठवले जाणार आहे.

टर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच भारताकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासहीन मोदी यांनी दिले आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे मुख्य सचिव डॉ. पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर टर्कीमधील भूकंपग्रस्त भागाला मदत करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.

Pune News : खराडी येथे बांधकामसाईटवर सुरुंगाचा स्फोट; एकाचा मृत्यू

भारत सरकारकडून टर्कीमध्ये एनडीआरएफच्या दोन टीम पाठवल्या जाणार आहेत. या दोन टीममध्ये एकूण 1000 कर्मचारी असतील.  (Turkey Earthquake) तसेच उत्तम प्रशिक्षण दिलेले श्वानपथके यामध्ये असतील. या बचावपथकासोबत आवश्यक ती सर्व उपकरणं दिली जातील. बचावपथकाकडून भूकंपग्रस्त भागात शोधमोहीम राबवली जाणार आहे. तसेच जखमी लोकांवर उपचार करणारी एक डॉक्टरांची टीमदेखील पाठवली जाणार आहे. या टीममध्ये प्रशिक्षित डॉक्टर्स असतील.

दरम्यान, टर्कीमधील या भूकंपामध्ये साधारण 1300 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आमच्याकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन जगभरातून दिले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.