Pimpri News : तासभर दिवे बंद करून ‘अर्थ अवर’ उपक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – तासभर पथदिवे बंद करून ‘अर्थ अवर’ या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने, विविध संस्था आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आकुर्डीच्या डॉ डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले आहे. या उपक्रमात मनपाने देखील सहभाग घ्यावा,अशी विनंती महाविद्यालयाने, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Pimpri News) माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी देखील कोल्हापूरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील पथदिवे बंद ठेवण्याची विनंती आयुक्तांना फोनद्वारे केली आहे.

 

2007 मध्ये मांडला गेलेला हा उपक्रम आहे. त्यावेळी पासून 185 देशांमध्ये या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये या उपक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी, आकुर्डी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून करण्यात येत आहे.

 

 

Chinchwad News : एक्साईड इंडस्ट्रीज कंपनी विरोधात कामगारांचे पिंपरीत ठिय्या आंदोलन

या उपक्रमाची माहिती देताना डी वाय पाटील अभियांत्रिकी आकुर्डी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालती म्हणाल्या कि, ” विजेच्या अति वापरामुळे पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल व ग्लोबल वार्मिंग यांचे दुष्परिणामांची जाणीव लोकांना करून देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.(Pimpri News)  या उपक्रमांतर्गत विज बचतीचा संदेश देण्यासाठी सुमारे 60 मिनिटे आपल्या घरातील विजेची उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ. संदीप सरनोबत यांनी संस्थेमधील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना केले आहे.”

 

या उपक्रमाला बळ देण्यासाठी संस्थेचे चेअरमन आमदार सतेज डी. पाटील यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक लाख स्ट्रीट लाईट बंद ठेवण्याची विनंती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त सिंग यांना केली आहे. असे झाल्यास संपूर्ण जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभागी होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहरास मान मिळू शकतो. म्हणून शहरातील नागरिकांचाही सहभाग त्यामध्ये महत्त्वाचा आहे.

 

अर्थ अवर 2023 बद्दल अधिक माहिती देताना उपक्रमाचे आयोजन करणारे प्रा. पी.डी. चौगुले म्हणाले कि, महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे शनिवार, दि. 25 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता 60+ या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. संस्थेतील एनएसएसचे सुमारे 200 विद्यार्थी मोबाईल टॉर्च चा वापर करून हा लोगो तयार करणार आहे. या उपक्रमाची आणखी व्याप्ती वाढवण्यासाठी सामान्य नागरिकाबरोबर शहरातील सर्व मॉल, ऍड एजन्सी, नगरसेवक यांनाही या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Pimpri News) उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ट्रस्टी तेजस पाटील व कॅम्पस डायरेक्टर रियर ऍडमिरल अमित विक्रम यांचे मार्गदर्शनाखाली प्रा. महेश ताटीकोंडा, प्रा. उत्कर्षा खराडे, कु. रिया थोपटे, अभिराम कुलकर्णी विशेष परिश्रम घेतले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.