Pune : …हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्षेपानंतर पुण्यातील कॉलेजने तुषार गांधी यांचे व्याख्यान केले रद्द

एमपीसी न्यूज – महात्मा गांधींचे पणतू व लेखक तुषार गांधी यांना पतितपावन या हिंदुवादी संघटनेने घेतलेल्या आक्षेपानंतर  मॉडर्न कॉलेजने त्यांचे व्याख्यान रद्द केले.

महात्मा गांधींचे पणतू व लेखक तुषार गांधी यांचे मॉडर्न कॉलेज येथे आज व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पतितपावन या संस्थेच्या आक्षेपानंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. गुरुवारी या प्रकरणाबद्दल ट्विट करत तुषार गांधी यांनी ही माहिती दिली. “गोली मारो संघटना पुन्हा सक्रिय” अशा पद्धतीचे ट्विट त्यांनी केले. माझं तुषार गांधी यांच्याशी बोलणं झाले आहे आणि त्यांना या प्रकाराबद्दल सूचित केले आहे.

आम्ही महात्मा गांधींच्या विरोधात नाही,  गांधी हे आमच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा भाग आहेत. पुढील पंधरा दिवसात आम्ही हे व्याख्यान पुन्हा आयोजित करणार आहे, अशी माहिती कॉलेजचे अध्यक्ष गजानन एकबोटे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिली. एकबोटे पुढे म्हणाले हिंदुत्व गटाच्या एका सदस्याने महाविद्यालयात तुषार गांधी यांचे व्याख्यान होऊ देऊ नका, असे सांगितले. महाविद्यालयात इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा चालू असल्यामुळे व आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू द्यायची नाही. त्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

“बापूंच्या १५० व्या जयंती दिनानिमित्त मॉर्डन कॉलेज पुणे येथे आयोजित कार्यक्रम रद्द करणे भाग पडले कारण त्यांनी मला आमंत्रित केले होते. पतितपावन संस्थेने मी उपस्थित राहिल्यास कार्यक्रमात व्यत्यय आणण्याची धमकी दिली. गोळी मारो गँग इन ऍक्शन” —- @तुषार गांधी, असे ट्विट त्यांनी केले आहे.

गृहहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण या प्रकरणाची दाखल घेतली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांना योग्य कारवाई करण्याची विनंती केली, अशी माहिती ट्विटरवरून दिली. तुषार गांधी यांनी याबद्दल त्यांचे आभार मानले. हिंदुत्व संघटनेसमोर नतमस्तक होण्याबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी जोरदार टीका केली. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेतृत्व असलेले सरकार तुषार गांधींना सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरले हे लाजिरवाणे आहे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.