Alandi : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्हाअध्यक्षपदी तुषार नेटके यांची निवड

एमपीसी न्यूज  – देशातील सर्वात मोठी चर्मकार समाजासाठी काम करणारी राष्ट्रीय चर्मकार महासंघ संघटना म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ संघटनेचे नाव आहे. आशा संघटनेच्या युवाजिल्हा अध्यक्ष म्हणून आळंदी (Alandi) येथील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे तरुण सामाजिक कार्यकर्ते तुषार (बाळु) लक्ष्मण नेटके यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.

Wakad : भरधाव दुचाकी घसरून दुचाकीस्वाराचा मृत्यू

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलप यांच्या आदेशानुसार मागील महिन्यात नाशिक येथील शिबीरामध्ये राज्यातील सर्व पदाधिकारी यांची पदे रद्द करून नवीन नियुक्त्या करण्याचे आदेश देण्यात आले होते.

शिबीरामध्ये ठरल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र दौरा नियोजन समिती स्थापन करण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कांबळे यांची निवड करण्यात आली. व जेष्ठ नेत्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या समितीची पदाधिकारी निवड कार्यक्रम दि.20 मे रोजी श्री.संत रोहिदास महाराज मंदिर पिंपरी चिंचवड येथे पार पडला.

यामध्ये जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या पद नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच युवा जिल्हा अध्यक्ष उत्तर विभाग म्हणून आळंदी देवाची येथील युवा समाजीक कार्यकर्ते तुषार (बाळु)लक्ष्मण नेटके यांची निवड करण्यात आली.
या निवडीचे सर्व भागातून स्वागत करण्यात येत आहे

यावेळी नवीन जिल्हाअध्यक्ष बाळु नेटके यांनी सांगितले की समाजाच्या सर्व क्षेत्रातील समाजबांधवासाठी मोठ्या ताकदीने काम करणार तसेच आळंदी देवाची येथील चांभार घाटासाठी विशेष पर्यंत करणार आसुन चांभार घाट मोकळा करून रहदारीस खुला करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर सांगितले.

यावेळी दौरा समिती प्रमुख ज्ञानेश्वर कांबळे , समिती सदस्य शशिकांत सोनवणे, आनंद गवळी , (Alandi)  सुदाम आण्णा लोखंडे, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे , अंकुशराव आंबेकर, उत्तमराव सोनवणे, समाजातील सर्व मोठे पदाधिकारी समाजबांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबतची माहिती तुषार नेटके यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.