Vadgaon Maval News : शिव वंदना ग्रुपच्या मावळ तालुकाध्यक्षपदी तुषार वहिले

एमपीसी न्यूज – शिव वंदना ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या मावळ तालुका अध्यक्ष पदावर वडगाव मावळ येथील तुषार वसंतराव वहिले यांची निवड करण्यात आली. वहिले यांना नियुक्तीचे पत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिनेश ठोंबरे यांनी दिले. ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर मोहिमा आयोजित करून स्वच्छता, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगत शिववंदना म्हटली जाते.

यावेळी ग्रुपचे दत्तात्रय यादव, लखन कंक, सागर डफळ, संतोष देशमुख, आदी उपस्थित होते.

शिव वंदना ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर मोहीम आयोजित करण्यात येते. यामध्ये स्वच्छता मोहीम, गडावर आलेल्या शिवभक्तांना शिवाजी महाराजांचे विचार सांगून प्रेरित करणे व शिववंदना म्हणणे, सामाजिक कार्य या ग्रुपच्या वतीने करण्यात येतात.

हा कार्यक्रम मावळ तालुक्यातील तिकोना गडावर पार पडला. यावेळी गडावर स्वच्छता मोहीम राबवून शिववंदना घेण्यात आली. पुढील काळात प्रत्येक गावात शिववंदना चालू करण्याचा व ग्रुपच्या माध्यमातून शिवकार्य तसेच सामाजिक उपक्रम, इतिहास कालीन मर्दानी खेळांचा प्रसार करणार असल्याचे मत तुषार वहिले यांनी यावेळी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.