Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या बारा घटना; पाच लाख 88 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या 12 घटना उघडकीस आल्या आहेत या घटनांमध्ये पाच लाख 88 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. भोसरी मधून 66 हजारांचे सोन्याचे दागिने तर हिंजवडी मधून 40 हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेले आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यात अज्ञात चोरट्याने दोन लाख 25 हजार 600 रुपये किमतीचे एक पिकअप चोरून नेले आहे. चाकण, निगडी, सांगवी आणि भोसरी पोलीस ठाण्यातही वाहन चोरीचे प्रत्येकी एक गुन्हे दाखल आहेत. चाकण मधून 25 हजारांची, निगडीमधून 20 हजारांची, सांगवी मधून 15 हजारांची तर भोसरी मधून 35 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे.

खेड तालुक्यातील काळूस येथील संगमेश्वर मंदिरातील दान पेटीतील तीन हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. मंदिराचा दरवाजा उघडा राहिला असताना अज्ञात चोरट्याने ही चोरी केली.

दिघी पोलीस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्ह्यात दोन मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून या चो-या झाल्या आहेत. प्रत्येकी 15 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरीला गेले आहेत.

सांगवी येथे बाळ सांभाळण्यासाठी ठेवलेल्या महिलेने घरातून डायमंड व सोन्याचे नेकलेस आणि रोख रक्कम असा एकूण 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्या महिलेला पोलिसांनी सीआरपीसी कलम 41 (अ) 1 ची नोटीस अदा करण्यात आली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगवडे येथून एका बांधकाम साईटवरून दोन चोरट्यांनी 50 हजारांचे बांधकाम साहित्य चोरून नेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.