Pune Accident News : स्कूल बसच्या चाकाखाली सापडून बारा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडगाव खुर्द परिसरात स्कूल बसच्या चाकाखाली सापडून एका 12 वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू (Pune Accident) झाला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. वडगाव खुर्द परिसरातील राजयोग सोसायटीतील मुरलीधर लायगुडे रुग्णालयासमोर ही घटना घडली. ब्लॉसम पब्लिक स्कूल ची बस वळण घेत असताना हा अपघात घडला. अर्णव अमोल निकम असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. ब्लॉसम पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आली होती. अर्णव आणि इतर विद्यार्थी बसमधून खाली उतरले. त्यानंतर बस वळवत असताना अर्णव अचानक बसच्या मागील चाकाखाली आला, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

School Starts Today : राज्यात आजपासून प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू; विद्यार्थ्यांची वाढली लगबग

दरम्यान अपघाताची (Pune Accident) माहिती मिळताच सिंहगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर (वय 49) त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सिंहगड पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.