India Corona Update : देशात वीस लाख जणांचे लसीकरण पूर्ण, गेल्या 24 तासांत 12,689 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. देशात आजवर 20 लाख पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. दुसरीकडे गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 689 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 06 लाख 89 हजार 527 एवढी झाली आहे. सध्या देशात 1 लाख 76 हजार 498 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 3 लाख 59 हजार 305 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 19 कोटी 36 लाख 13 हजार 120 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 5 लाख 50 हजार 426 नमून्यांची तपासणी मंगळवारी (दि.26) करण्यात आली आहे.

 

गेल्या 24 तासांत देशभरात 137 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 53 हजार 724 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌.

गेल्या 24 तासांत देशभरात 13 हजार 320 

बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, देशाचा रिकव्हरी रेट 96.81 टक्के एवढा झाला आहे. देशात आतापर्यंत 20 लाख 29 हजार 724 जणांचे लसीकरण झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.