Pimpri : एक लाखापुढील वीस हजार थकबाकीदार, आठ दिवसात कराचा भरणा करा, अन्यथा मालमत्ता जप्त

नागरिकांनी मालमत्तेची नोंदणी करण्याचे महापालिकेचा आवाहन

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एक लाखांपुढील 19 हजार 993 थकबाकीदार असून महापालिकेने थकबाकीसह मिळकत कर भरण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. आठ दिवसांच्या आत कराचा भरणा करावा. अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाईचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच कर संकलन विभागाने वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. करचुकव्यांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी स्वत:हून मालमत्तेची नोंद करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला 5 लाख 25 हजार मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी महापालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. पाच लाख मिळकतीपैंकी एक लाखांवरील मोठ्या थकबाकीधारकांची संख्या 19 हजार 993 इतकी आहे. थेरगाव कर संकलन कार्यालयाकडे सर्वाधिक 3 हजार 949 मोठे थकबाकीदार आहेत. त्यापाठोपाठ चिखली कार्यालयाकडे 3 हजार 338 आणि भोसरी कार्यालयाकडे 1 हजार 898 मोठे थकबाकीदार आहेत. एक हजारपेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या कर संकलन कार्यालयाची संख्या 6 असून पाचशेपेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या कार्यालयांची संख्या 8 आहे. कमी थकबाकीदार असलेल्या केवळ 2 आहे.

महापालिकेच्या सर्व 16 विभागीय कर संकलन कार्यालयाकडून एक लाख आणि त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर आठ दिवसांच्या आत त्यांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकत कराचा भरणा करावा.  अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच कर संकलन विभागाला वसुली मोहीम तीव्र करण्याचे आदेशही दिले आहेत.

करचुकवे शोध मोहीम

शहरातील करचुकवे करणा-यांची शोध मोहीम सुरु केली आहे. महापालिकेच्या चांगल्या सुविधांसाठी नागरिकांनी नियमितपणे कराचा भरणा केला पाहिजे. स्वत:हून पुढे येऊन मालमत्तेची नोंद करावी. जे नागरिक स्वत: पुढे येणार नाहीत. त्यांच्याकडून दंडात्मक कारवाईसह कर वसूल केला जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like