Lonavala News : लोणावळ्याजवळील वलवण गावातून दोन कासवांना दिले जीवनदान

एमपीसी न्यूज – वलवण गावातील तलावातील गाळ काढणे व इतर कामे चालू आहेत. या गाळात दोन मोठी कासवे सापडली. वनखाते, लोणावळा नगरपालिका, व (Lonavala News) शिवदुर्ग ने वलवण येथील धरणात सोडून त्यांना जीवदान दिले. आदित्य पाळेकर, ओंकार पाळेकर, सुनिल पाळेकर यांच्या कामगारांना ही दोन्ही कासवे सापडली होती.

वनखात्याचे संदीप रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणावळा नगरपालिकेचे विजय साळवे, शिवदुर्ग मित्र, लोणावळाचे सुनील गायकवाड, राजेंद्र कडु, अमोल सुतार, (Lonavala News) कपिल दळवी, सचिन तारे , टाटांचे सुरक्षा अधिकारी सतिष सगर यांनी दोन्ही कासवे सुरक्षीत धरणाच्या पाण्यात सोडून दिली.

IND vs AUS Test Match : ऑस्ट्रेलियन संघाने उभारला धावांचा डोंगर

गोड्या पाण्यातील कासव Sweet Water Turtle या जातीच्या सुमारे 19 इंच व 16 इंच इतकी मोठी कासवे होती. यांचे आयुष्यमान 150 वर्षांपेक्षा जास्त असते. त्यामुळे यांचा आकार चांगला मोठा होतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.