Pimpri News: गतवर्षीपेक्षा पवना धरणात दुप्पट पाणीसाठा

एमपीसी न्यूज – मागील सहा दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी  पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला फक्त 34.45 टक्के पाणीसाठा होता. आजमितीला धरणात 79.13 टक्के पाणीसाठा धरणात आहे. त्यामुळे पुढील 8 ते 9 महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. पवना धरण परिसरात पावसाने सहा दिवस जोरदार बॅटिंग केली.

त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.
पाणलोट क्षेत्र परिसरात  गेल्या 24 तासात  117 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. काल 74.64 टक्के आणि आज 79.13 टक्के पाणीसाठा धरणात आहे. दोन दिवसांत 5 टक्क्यांनी पाण्यात वाढ झाली आहे.

पवना धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = *117मि.मि.*

# 1 जूनपासून झालेला पाऊस = *1642मि.मि.*

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस =       496
# धरणातील सध्याचा पाणीसाठा = *79.13% टक्के*

#गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = *       34.45% टक्के*

# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *4.49% टक्के*

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *47.54% टक्के*

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.