Pabal : जुळ्या भावंडांचे मार्कही ‘जुळे’ !

एमपीसी न्यूज- जुळ्या मुलांच्या दिसण्याबरोबरच त्यांच्या सवयी, आवडी निवडी सारख्या असतात हे आपल्याला माहित आहे. पण त्यांनी मिळविलेले मार्क देखील एकसारखे असू शकतात यावर तुमचा विश्वास बसणार नाही. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत पाबळ येथे राहणाऱ्या स्वरूप नंदकुमार कानडे आणि ओंकार नंदकुमार कानडे या जुळ्या विद्यार्थ्यांनी एकसारखे म्हणजे अगदी जुळे मार्क मिळविले आहेत. दोघांनाही दहावीच्या परीक्षेत 91.60 टक्के गुण मिळाले आहेत.

स्वरूप आणि ओंकार हे दोघेजण पाबळ येथील भैरवनाथ विद्यालयात शिकतात. दोघेही अभ्यासात हुशार आहेत. दहावीचा अभ्यास त्यांनी मन लावून केला. दोघांनाही चांगले मार्क मिळणार याची त्यांच्या पालकांना तसेच शाळेतील शिक्षकांना खात्री होती. पण आज निकाल लागल्यानंतर स्वरूप आणि ओंकार कानडे या दोघांनाही 91.60 टक्के गुण प्राप्त झाल्याचे समजताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शाळेतील शिक्षकांनी तसेच त्यांच्या मित्रमैत्रिणींनी दोघांचे अभिनंदन केले.

"Nandkumar

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.