BNR-HDR-TOP-Mobile

निगडी ज्ञानप्रबोधिनीच्या दोन जुळ्या भावंडांची सायकल मोहिम फत्ते

पर्यावरण संदेश देत दोन दिवसांत केला 332 कि.मी.चा प्रवास

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – ज्ञानप्रबोधिनी निगडीच्या इयत्ता सहावीतील जुळया बहिण भावंडानी दोन दिवसांत 332 कि.मी.चा प्रवास पूर्ण करत सायकल मोहिम फत्ते करून पर्यावरण बचावाचा संदेश दिला.

याबाबत अधिक माहिती सांगताना श्रीतेज आणि श्रृतिकाचे वडील प्रकाश शेंडबाळे म्हणाले की, धाडसी, साहसी, दृढःनिश्चयी, निसर्गप्रेमी आणि सायकलिंगची आवड बाळगत ही अहिंसा, सदभावना आणि पर्यावरण मोहिमअंतर्गत श्रीतेज प्रकाश शेडबाळे आणि श्रुतिका प्रकाश शेडबाळे (वय ११) या दोन जुळ्या भावडांनी निगडी ते मिरज असा ३३२ कि.मी.चा प्रवास पूर्ण केला. हा प्रवास निगडी ते मालेगाव सायकलने अवघ्या दोन दिवसांत प्रवास पूर्ण केला.

प्रवासादरम्यान बॅनरच्या सहाय्याने पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी सायकल चालविण्याची जनजागृती केली. या मार्गात ठिकठिकाणी चांगला प्रतिसादही त्यांना मिळाला. निगडीमध्ये आल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने या दोन जुळ्या भावंडाचा सत्कार निगडीतील जैन मंदिरात करण्यात आला.

यावेळी क्रीडाप्रबोधिनीचे प्रमुख  मनोज देवळेकर, मुख्याध्यापिका मधुरा लुंकड, वर्गशिक्षिका स्मिता झणझणे, मोतीलाल चोरडिया, शारदा चोरडिया, अजित पाटील, उमेश पाटील, सुरगोंडा पाटील, भूपाल बसन्नावार, ज्ञानप्रबोधिनीचे गोपीचंद बोरकर, संजय पाटील, मोहन पुरी, आदी उपस्थित होते. या अहिंसा, सदभावना व पर्यावरण मोहिमेअंतर्गत निगडीतील पाच जणांनी निगडी ते झारखंड (शिखरजी) हा प्रवास पूर्ण करीत आहे.

पुढील मोहिमेची माहिती देताना ते म्हणाले, पुणे-नगर-औरंगाबाद-वर्धा-नागपूर-भंडारा-राजनंदगाव-संबलपूर-रांची-गिरडीह-मधुबन-झारखंड असा तेरा दिवस सायकलिंग प्रवास करणार आहे. सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी, या उद्देशाने ही सायकल मोहिम आम्ही करत आहोत. जैन मंदिराचे अध्यक्ष अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम होत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.