Twist in Rang mazha vegla : दीपा की श्वेता, कोण होणार कार्तिकची पत्नी ?

Deepa or Shweta, who will be Karthik's wife? स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ १३ जुलैपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

एमपीसी न्यूज – अनलॉक २ सुरु झाले आणि काही प्रमाणात मनोरंजन क्षेत्राने सुटकेचा निश्वास टाकला. योग्य ती काळजी घेऊन मालिकांचे शूटींग सुरु झाले. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ १३ जुलैपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकेच्या कथानकात रंजक वळण येणार आहे. दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची धामधूम तर सुरु आहेच पण दीपा आणि दीपाची बहीण श्वेता यांच्या लग्नातल्या सेम टू सेम ड्रेसने मात्र कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे.

दीपा आणि कार्तिकचं लग्न होऊ नये म्हणून सौंदर्या इनामदार, श्वेता आणि राधाई यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दीपाऐवजी श्वेताचं लग्न कार्तिकशी व्हावं म्हणून सौंदर्याने प्लॅनही आखलाय. यासाठी दीपा आणि श्वेताचा लग्नातला ड्रेस अगदी सारखा ठरवण्यात आलाय. आता ऐन मुहूर्तावेळी दीपाऐवजी श्वेता लग्नासाठी उभी राहणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे कार्तिकचं लग्न नेमकं कोणाशी होणार याची उत्सुकता आहे.

तर आपल्या प्रेमावर विश्वास असणारी दीपा आता ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळे कथानकातील या वेगळ्या वळणामुळे‘रंग माझा वेगळा’चे पुढील भाग अत्यंत उत्सुकता वाढवणारे असतील. जवळपास तीन महिन्यांनंतर मालिकेच्या शूटिंगच्या सुरुवात झाली आहे. त्यामुळे कथेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.