Twitter Account Hacked: PM मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटचे टि्वटर अकाऊंट हॅक, हॅकरकडून बिटकॉइनची मागणी
टि्वटरनेही पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटचे टि्वटर अकाऊंट हॅक झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटचे टि्वटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरने कोविड-19 रिलीफ फंडसाठी देणगी म्हणून बिटकॉइनची मागणी केली आहे. परंतु, हे टि्वट त्वरीत डिलीट करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटच्या टि्वटर अकाऊंटवरील एका संदेशात म्हटले की, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, कोविड-19 साठी बनवलेल्या पीएम मोदी रिलीफ फंडमध्ये देणगी द्या.
आणखी एका ट्विटमध्ये हॅकरने म्हटले की, हे अकाऊंट जॉन विकने ([email protected]) हॅक केले आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक केलेले नाही. परंतु, नंतर हे टि्वट डिलीट करण्यात आले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटच्या या टि्वटर अकाऊंटचे 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. टि्वटरनेही पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाइटचे टि्वटर अकाऊंट हॅक झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
टि्वटरने म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक वेबसाइटचे एक अकाऊंट अनेक टि्वट्सबरोबर हॅक केले आहे.
दरम्यान, टि्वटरच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्ही याची चौकशी करत आहोत. सध्या इतर कुठले अकाऊंट प्रभावित झाल्याची माहिती आम्हाला नाही.