Twitter Engagement : पंतप्रधान मोदी, दीपक चौरसिया, कुणाल कामरा आणि सोनू सूद ट्विटरवर टॉपला

एमपीसी न्यूज – ‘ट्विटीट’ या सोशल मीडियाचं विश्लेषण करणा-या संस्थेने ट्वीटर एन्गेजमेंट बाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राजकीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक 76.65 लाख एवढी ट्वीटर एन्गेजमेंट मिळाली आहे.

त्यानंतर चित्रपट कलाकार सोनू सूद, पत्रकार दीपक चौरासिया, कॉमेडियन कुणाल कामरा, क्रिकेटर विराट कोहली हे आपआपल्या विभागात टॉपवर आहेत.

‘ट्विटीट’ या सोशल मीडिया विश्लेषण करणा-या संस्थेने नोव्हेंबर महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘ट्विटीट’ ट्वीटरचे 20 विभागात दैनंदिन विश्लेषण करते आणि माहितीच्या आधारे मासिक अहवाल तयार केला जातो.

या विभागात विविध पक्षाचे राजकिय नेते, पत्रकार, उद्योजक, गुंतवणुकदार, खेळाडू, सिनेमा कलाकार, लेखक, कॉमेडियन यांचा समावेश आहे.

* या अहवालनुसार दहा विभागातील टॉपर आणि ट्वीटर एन्गेजमेंट

राजकिय – नरेंद्र मोदी – 76 लाख 65 हजार 669

बॉलीवूड – सोनू सूद – 18 लाख 84 हजार 353

उद्योजक – आनंद महिंद्रा – 40 लाख 01 हजार 05

_MPC_DIR_MPU_II

क्रिकेटर – विराट कोहली – 17 लाख 76 हजार 838

खेळाडू – विजेंद्र सिंह (बॉक्सर) – 3 लाख 53 हजार 231

टिव्ही स्टार – सिद्धार्थ शुक्ला – 3 लाख 40 हजार 036

पत्रकार – दीपक चौरासिया – 25 लाख 08 हजार 471

संस्थापक – कुणाल शहा – 72 हजार 355

कॉमेडियन – कुणाल कामरा – 18 लाख 53 हजार 563

प्रादेशिक चित्रपट कलाकार – 9 लाख 14 हजार 669

राजकीय विभागात पहिले तीनही क्रमांक भाजपच्या नेत्यांचे आहेत.  यामध्ये मोदी प्रथम, द्वितीय अमित शहा आणि तिस-या क्रमांकावर योगी आदित्यनाथ आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची दुस-या क्रमांकावरून चौथ्या स्थानी वर्णी लागली आहे.

बॉलीवूड अभिनेता सोनू सूदच्या कोराना काळातील कामाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. सोशल मीडियावरही सोनू सूद हिरो ठरला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.