Twitter News : ‘ही’ ट्विटर खाती बंद करा; केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे ट्विटरला आदेश
एमपीसी न्यूज: भारताच्या केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला 250 च्या आसपास ट्विट्स/ ट्विटर खाती ब्लॉक करण्यास सांगितले आहे.
#ModiPlanningFarmersGenocide या हॅशटॅगचा वापर करताना आढळून आलेली खाती ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटरला देण्यात आले आहेत.
30 जानेवारीला काही खाती हा हॅशटॅग वापरत होती. ही ट्विट्स नरसंहाराला चिथावणी देत असून, खोटी माहिती पसरवत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून ही खाती ब्लॉक करण्याचे आदेश केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला दिले.
आयटी ॲक्टच्या सेक्शन 69A च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार ट्विटरने ह्या ट्विट्सवर व खात्यांवर कारवाई करत ही खाती ब्लॉक केली आहेत.