Pune : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासूनच्या फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पोलीस अभिलेखावरील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासूनच्या फरार आरोपीला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी आज गुरुवारी (दि.6) ही कारवाई केली.

सोन्या खंडागळे, असे या आरोपीचे नाव आहे. सोन्यावर सूरज विश्वास कांबळे (रा. पर्वती) याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात 17 जानेवारी 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना आरोपी सोन्या खंडागळे हा मांजरी येथे त्याच्या मावशीच्या घरी नाव बदलून राहत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. ही माहिती वरिष्ठांना सांगून त्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी महादेव नगर मांजरी येथून आरोपी सोन्या याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता अभिजित खंडाळे या मित्रासोबतचा वाद मिटवल्याचा राग मनात धरून 17 जानेवारी 2018 ला फिर्यादी कांबळे याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.

आरोपी सोन्याला दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.