Crime News : कर्नाटक येथून पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक, 9 किलोचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज कर्नाटक राज्यातून गांजा विक्रीसाठी (Crime News) आलेल्या दोघांना वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 7 लाख 52 हजार रुपयांचा 9 किलो गांजा जप्त केला आहे.

राहूल विठ्ठल जाधव (वय 22 रा. रा. कर्नाटक) व शालीवान आप्पाराव वाडी (वय 32 रा.कर्नाटक) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदिप सोमनाथ गवारी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, (Crime News) कर्नाटक राज्यातून गांजाची विक्री कऱण्यासाठी थेरगाव येथील बिर्ला हॉस्पीटल जवळ येणार आहे अशी खबर मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारमध्ये आलेल्या दोघांना ताब्यात घेतले.

Pune Crime : डीजे च्या आवाजाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने थेट साऊंड सिस्टीमची केली तोडफोड

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 9 किलो 300 ग्रॅम वजनाचा 7 लाख 52 हजार 240 रुपयांचा गांजा जप्त केला. आरोपींवर  एनपीडीसी अक्ट अतंर्गत  वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींना आज (दि.10) मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हि कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे-1 पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे – 2 संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर, सहाय पौलीस फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, मारणे, पोलीस हवालदार वंदु गिरे, पोलीस हवालदार संदीप गवारी, दिपक साबळे, स्वप्नील खेतले, आतिश जाधव, प्रमोद कदम, (Crime News) पोलीस नाईक प्रशांत गिलबीले, पोलीस नाईक अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोलीस शिपाई अजय फल्ले, तात्या शिंदे, कौंतेय़ खराडे, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, सागर पंडित यानी कारवाई केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.