House Break In News : चिखलीत अडीच लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – राजे शिवाजीनगर, चिखली परिसरात एक घरफोडीची घटना घडली. त्यात चोरट्यांनी दोन लाख 41 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री सव्वा दहा ते साडेअकरा वाजता घडली.

रामदास बाबुराव जाधव (वय 33, रा. राजे शिवाजीनगर, चिखली. मूळ रा. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव त्यांच्या मावस बहिणीला भेटण्यासाठी बुधवारी रात्री तळेगाव दाभाडे येथे गेले होते. रात्री सव्वा दहा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांचे घर बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने असे एकूण 2 लाख 41 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.