Crime News : दोन पिस्टल, जिवंत काडतुसे व कोयत्यासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन पिस्टल 4 जिवंत काडतुसे व कोयता अशा शस्त्रांसह (Crime News) दोघांना अटक केली आहे. एक कारवाई चिंचवड येथे तर दुसरी कारवाई ही तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी (दि.26) करण्यात आली आहे.

पहिली कारवाई ही पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने वेताळनगर येथे केली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी तडीपार आरोपी इम्रान रहिम शेख (वय 22 रा.चिंचवड) याला 200 रुपयांच्या कोयत्यासह अटक केली आहे.

Pune News : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची‌ सरपंचांसोबत ‘लंच पे चर्चा’

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाने आरोपीला दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरी तो हद्दीत शस्त्रासह वावरत असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

तर दुसऱ्या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे येथील चाकण-तळेगाव रोडवरील श्रेया हॉटेल समोर एकाला 2 देशी बनावटीचे पिस्टल व 4 जिवंत काडतुसासह अटक केली आहे. मंगेश नंदकुमार सांगळे (वय 24 रा.चिंचवडगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. (Crime News) त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी विरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.