Chakan : पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 25 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी केली.

अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील (वय 24, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. मूळ रा. फत्तेपूर गोद्री, ता. जामनेर, जि. जळगाव), प्रसाद राजाराम खांडेभराड (वय 21, रा. कडाचीवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निखील बाळासाहेब वर्पे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासे फाट्याजवळ दोघेजण संशयितरीत्या थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन आरोपी अक्षय आणि प्रसाद यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 25 हजार 800 रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त करत आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.