Nigdi Crime News : निगडी, भोसरी मध्ये शस्त्र बाळगल्या बाबत दोघांना अटक

एमपीसी न्यूज – शस्त्र बाळगल्या प्रकरणी निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निगडी येथे एका तरुणाने तलवार घेऊन आरडाओरडा करत दहशत निर्माण केली, तर कासारवाडी येथे एका व्यक्तीने सुरा जवळ बाळगला. याबाबत मंगळवारी (दि. 12) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

अक्षय फुलचंद गाडे (वय 25, रा. अजंठानगर, चिंचवड) असे निगडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण उर्फ आबा भिवा सोनवणे (वय 52, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला ‘विनाकारण पाणी उपसू नको’ असे सांगितले. त्या कारणावरून आरोपीने शिवीगाळ व मारहाण करून तलवार घेऊन ‘आज या आबाची विकेटच पाडतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर तलवार हातात घेऊन आरडाओरडा करत पत्राशेडमध्ये राहणा-या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

जुबेर खालील शेख (वय 44, रा. घोरपडी पेठ, पुणे) याला सुद्धा भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस शिपाई तुषार वराडे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अवैधरित्या एक लोखंडी सुरा दहशत माजवण्यासाठी जवळ बाळगला. त्याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.