Bhosari Crime News : शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – शस्त्र बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 20) दुपारी तीन वाजता ई क्षेत्रीय कार्यालयाशेजारी भोसरी येथे करण्यात आली.

करण आण्णा कडुसकर (वय 23, रा. गुळवे वस्ती, भोसरी), आशिक नसरुद्दीन शेख (वय 27, गुळवे वस्ती, भोसरी, मुजफ्फरपूर,बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अवैधरित्या कोयता बाळगला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. करण आणि आशिक यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 400 रुपये किमतीचे दोन कोयते जप्त केले. त्यांच्या विरोधात हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार हेमंत खरात तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.