Chakan Crime News : लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करून घेणा-या तिघांवर गुन्हा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – एका महिलेसह तिघांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, भारतीय दंड विधान कलम 370 (3), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी दोन महिलांकडून लॉजवर वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 27) दुपारी निघोजे येथे करण्यात आली.

विष्णू भगवान झांझे (वय 37, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), योगेश गोवर्धन वारे (वय 26, रा. निघोजे, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या महिला (वय 30) साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दोन महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते.  महिलांना आरोपींनी पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून निघोजे येथील हॉटेल आर्यन लॉजिंग अँड बोर्डिंग येथे कारवाई केली. आरोपी विष्णू आणि योगेश यांच्याकडून पोलिसांनी 33 हजार 85 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.