Wakad Crime News : गुन्ह्याच्या घटनास्थळी निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची पकडली कॉलर; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – गुन्ह्याच्या घटनास्थळी जात असताना रस्त्यात वाहतुकीस अडथळा होत असलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने दोघांनी गणवेशातील पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मोटादेवी मंदिराच्या जवळ कैलासनगर, थेरगाव येथे घडली.

नरेश पारख (वय 40) व धर्मेंद्र पारख (वय 40, पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप हे दखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन साक्षीदारांचा तपास करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची गाडी रस्त्यामध्ये लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ते वाहन रस्त्याच्या बाजूला घेण्याबाबत फिर्यादी समज देत होते. त्यावेळी फिर्यादीने पोलिसांचा शासकीय गणवेश परिधान केला होता. असे असतानाही आरोपींनी फिर्यादीच्या गणेशाची कॉलर पकडून घटनास्थळी भेट देण्यापासून फिर्यादीला परावृत्त केले. तसेच आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.