Pune Crime News : कोयत्याच्या धाकाने तरूणाला लुटणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : कोयत्याच्या धाकाने तरूणाच्या खिशातील 12 हजारांची रोकड चोरून नेणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केले. ही घटना 4 मार्चला रात्री साडेनउच्या सुमारास घोरपडे पेठेत घडली होती.

बाप्पा कसबे (रा. घोरपडे पेठ)  आणि रोहन दत्तू शेंडगे (रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राहूल भोसले वय 28, रा. आंबेगाव बुद्रूक  यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

राहूल तीन दिवसांपुर्वी घोरपडे पेठेतून जात होता. त्यावेळी आरोपी बाप्पाने राहूलला अडवून कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या खिशातील 12 हजारांची रोकड काढून घेतली. त्यावेळी राहूलने जोरजोरात आरडा-ओरड केल्यामुळे परिसरातील काही लोक त्याच्या मदतीसाठी धावून आले.

त्यावेळी आरोपी बाप्पाने हवेत कोयता फिरवून मी  भाई असून कोणी पुढे आल्यास कापून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे परिसरातील लोक भीतीने पळून गेले. याप्रकरणी  पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.