Bhosari News : हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालवल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – दिघी रोड, भोसरी येथील एका हॉटेलवर भोसरी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. तसेच दोघांना अटक केली आहे.

गोपाळ लिंबा पाटील (वय 25), समाधान प्रकाश वाघ (वय 26, दोघे रा. दिघी रोड, भोसरी) अशी अटक केल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांसह हॉटेल चालक बाळा आण्णा शेट्टी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनीवरी (दि. 6) रात्री पावणे आठ वाजता करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी रोड, भोसरी येथील हॉटेल कावेरी लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. त्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी या दोन महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळणा-या पैशांवर आरोपी गुजराण करत होते. याबाबत दोघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, भोसरी पोलिसांनी परिसरातील हॉटेल, लॉज  चालक, मालकांना नोटीस दिली आहे. हॉटेल मध्ये येणा-या सर्व ग्राहकांची नोंद एका वहीमध्ये घरून घ्यावी, तसेच ग्राहकाचे ओळखपत्र देखील घ्यावे. मात्र हॉटेल कावेरी लॉज येथे कोणतीही नोंदवही आढळली नाही. त्यामुळे आरोपींच्या विरोधात शासकीय आदेशाचा भंग केल्याबाबत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.