Pune News : धोकादायक मांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 50 हजाराचा मांजा जप्त

एमपीसी न्यूज : पशुपक्ष्यांच्या आणि नागरिकांच्या जीवांच्या दृष्टीने धोकादायक ठरू पाहणाऱ्या मांजाची विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीचे 19 रीळ जप्त केले आहेत. जुनेद अकबर कोल्हापूरवाला (वय 29) आणि अदनान असिफ अली सय्यद (वय 19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षक कायदा नुसार फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरवर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या मांजाची सर्रास विक्री केली जाते. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून घातक मांजा विक्री करणाऱ्याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

त्यानुसार रविवार पेठेतील बोहरी आळीत घातक मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्या ठिकाणी छापा मारला. यावेळी पोलिसांनी दुकानातून मांजाचे 19 रीळ आणि रोख पन्नास हजार रुपये जप्त केले. तर दोघांना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.