Hinjawadi Crime News : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत असलेल्या एका तरुणाचा मोबाईल दोन चोरट्यांनी हिसकावला. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री सव्वाआठ वाजता मारुंजी येथे घडली. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे.

सुनील शंकर सिंग (वय 21, रा. मारुंजी, ता. मुळशी. मूळ रा. बिहार) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश भीमराव वायकर (वय 19, रा. दत्तवाडी नेरे, ता मुळशी), विजय राजू वाघमारे (वय 19, रा. नेरे, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवाडी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर पायी चालत घरी जात होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आले. आरोपींनी फिर्यादी यांच्या हातातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.