Hinjawadi : उघड्या दरवाजावाटे चोरी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट चारने (Hinjawadi) अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Hinjawadi : संगणक हॅक करून पाठवला धमकीचा मेसेज

उमेश उर्फ गिड्या तान्हाजी शिंदे (वय 20, रा. वाकड), सनी विजय सारसन (वय 19, रा. पिसे वस्ती, दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून मोबाईल फोन चोरून नेल्याच्या घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडत आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट चारने तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारामार्फत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे हिंजवडी (Hinjawadi) पोलीस ठाण्यातील दोन, वाकड, चिंचवड, निगडी, भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मिसिंग प्रकरणातील मुद्देमाल देखील पोलिसांना मिळाला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.