Talegaon Crime News : दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणात एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – दारू पिताना किरकोळ भांडण झाले. या भांडणामध्ये एकाला शिवीगाळ करत धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी दोघांनी अटक करण्यात आली आहे.

राजू केदारी (वय 19 वर्षे, रा. ठाकरवाडी, परंदवाडी) आणि नवनाथ काळोखे (वय 21 वर्षे, रा. ठाकरवाडी, परंदवाडी) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याविषयी पीडित ऋषिकेश लिंभोरे (वय 24 वर्षे, रा. धामणे, तालुका मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

Guinness World Record : पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘लिंबो स्केटिंग’मध्ये देशना नहारची अतुलनीय कामगिरी

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीचे दोन्ही आरोपी हे परंदवडी गावच्या हद्दीत पवना नदीच्या पात्रानजीक 18 जून रोजी रात्री 8 च्या सुमारास दारू पीत असताना किरकोळ भांडण झाले. भांडण झाल्यानंतर फिर्यादी लिंभोरे घरी जाण्यास निघाले. दरम्यान नदीपात्रातील रस्त्यात आरोपींनी त्यांची अडवणूक करत त्यांनापकडून ठेवले. दोघांनी लिंभोरे यांना शिवीगाळ करून धारदार शस्त्राने डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

Yashwant Sinha Profile: विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेले ‘यशवंत सिन्हा’ कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

याप्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे (शिरगांव चौकी) पोलिसांनी  दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.