Pune Crime News : दारू आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून कामगाराला बदडले

एमपीसी न्यूज – दारू आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून बिअरबारमधील कामगारासह दोघांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी सागर बाळोसो आटोळे (वय २०) आणि तन्म अजित बेडगे (वय २३ रा. ससाणेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लक्ष्मण झिंजुर्डे असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत दीनेश रघुपती नल्ला (वय ४० रा. गुरूवार पेठ) यांनी हडपसर पोलीसांत तक्रार दिली आहे.

Sidhu Moose Wala Death Update : वडिलांच्या मृत्यूनंतर संतोष गुन्हेगार बनला; सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील आरोपीच्या आईला अश्रू अनावर

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील अमरसिद्धी कॉम्पेक्समध्ये तक्रारदारांचे बिअरबार असून त्या ठिकाणी कामगार लक्ष्मण झिंजुर्डे काम करतो. तक्रारदार हे काऊंटरवर बसलेले होते. त्यावेळी लक्ष्मण याने सागरकडे दारू व पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले, त्याचा राग आरोपींना आला. त्यांनी बारमध्ये पुन्हा परत येऊन लक्ष्मण याच्यावर कोयत्याने वारकरून त्याला जखमी केले. तक्रारदर सोडविण्यास गेले असता त्यांच्यावर वार करण्यात आले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.