Pune : लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड केल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.  खडक पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज करण पुट्टीलाल सरोज, (रा. गुरुवार पेठ, पुणे), मनोजकुमार झल्लार (वय 19, रा. पुणे), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सायबर सेलचे पोलीस शिपाई समीर पटेल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज व मनोजकुमार यांनी 28 एप्रिल 2019 रोजी लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड केले होते. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल व सीमकार्ड जप्त केले आहे. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.