Bhosari : स्वीट मार्टमध्ये तोडफोड करून चोरी करणा-या दोघांना अटक

Two arrested for vandalizing Sweet Mart in Bhosari area.

एमपीसी न्यूज – स्वीट मार्टच्या दुकानात तोडफोड करून जबरदस्तीने रोकड चोरून नेली. तसेच दुकानाच्या मालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी पावणे सात वाजता हरिओम स्वीट मार्ट, दिघी रोड, भोसरी येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ओंकार ढोबळे (वय 24), सौरभ मोतीरावे (व 19, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मोहनलाल वरदाजी सोहेल (वय 35, रा. शंकर गवळी चौक, दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पावणे सात वाजता आरोपी दिघी रोड येथील हरिओम स्वीट मार्टसमोर आले. त्यांनी रस्त्यावर पडलेला सिमेंटचा ब्लॉक घेऊन स्वीट मार्ट दुकानाच्या काचेवर मारून सात हजार रुपयांचे नुकसान केले.

त्यानंर दुकानात घुसून ‘मालक कुठं आहे’ असे म्हणत ‘गल्ल्यातील पैसे काढ, नाहीतर मारून टाकीन’ अशी धमकी देत काउंटरवर असलेले दीड हजार रुपये जबरदस्तीने घेतले.

दुकानाचे मालक गोरख गवळी आरोपींना अडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि दुचाकीवरून पळून गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.