Pune Crime News : वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरणातील दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाळू व्यावसायिक संतोष जगताप याला दिवसाढवळ्या गोळ्या घालून त्याचा खून करण्यात आला होता. उरळी कांचन येथील हॉटेल सोनाई समोर शुक्रवारी (दि.22) चार जणांनी त्याच्यावर गोळ्या झाडत त्याचा खून केला होता. या घटनेतील दोन आरोपींना पुणे पोलीस, गुन्हे शाखा, युनिट सहा यांनी अटक केली आहे.

पवन गोरख मिसाळ (वय 29, रा. दत्तवाडी, उरळी-कांचन, हवेली) आणि महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय 26, रा. रा. दत्तवाडी, उरळी-कांचन, हवेली) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपींच्या ठिकाणाचा पोलिसांना सुगावा लागला, त्यानंतर पथक तयार करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना घातक शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हे शाखाने तीस तासांत ही कामगिरी केली आहे. पुणे पालीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.