Chakan News : वाकीतील खून प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज : हॉटेलच्या व्यवस्थापकासह कुकला मारहाण केल्याच्या रागातून हॉटेल मालकाने आणि त्याच्या साथीदाराने दोघांवर केलेल्या हल्ल्यात एकाचा खून व एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेमंत संतोष सुतार ( रा. लादवड, ता. खेड, जि. पुणे ) असे तलवारीने खून केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरज विठ्ठल वाळूंज ( वय – 28, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड ) असे मोटारीचे चाक पायावरून गेल्याने गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वाकी खुर्द येथील हॉटेल सागरचा मालक ऋतिक अतुल वहिले ( वय – 22,) व मयूर बाळासाहेब येवले ( वय – 20, दोघेही रा. वाकी खुर्द, ता. खेड ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांकडून गुन्ह्यात वापरलेली तलवार, लाकडी दांडकी व ब्रीझा कार ( क्र. एम.एच. 14 जी.ए. 7779 ) जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.