Chinchwad : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज –  शस्त्र बाळगल्या प्रकरणी (Chinchwad) खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यातील एकजण तडीपार गुंड आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) दुपारी साडेतीन वाजता दळवीनगर, चिंचवड येथे करण्यात आली.

अविनाश उर्फ तोत्या शिवाजी पांढरकर (वय 24, रा. पांढरकरनगर, आकुर्डी), प्रफुल्ल राजेंद्र ढोकणे (वय 24, रा. डांगे चौक, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : दक्षिण कमांडद्वारे सदर्न स्टार आर्मी -शिक्षण, उद्योग सन्मुखता कार्यक्रमाचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवीनगर येथील उड्डाणपुलाच्या खाली दोघेजण शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. (Chinchwad) त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक सुरा आणि एक कोयता अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपी अविनाश पांढरकर याला 31 मे 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात विनापरवाना आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.