Pune Crime News : पिस्तूल बाळगणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पिस्तूल बाळगणा-या दोघांना चंदनननगर पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून पिस्तूलासह 5 जिंवत काडतुसे आणि मोटार मिळून 10 लाख 41 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आले.

बजरंग विठ्ठल शिरगे (वय 20, रा. वडगाव शेरी ) आणि रणजित रामचंद्र लोंढे (वय 38, रा. खराडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पिस्तूल बाळगणारे दोघे  खराडीतील तुकारामनगरमध्ये मोटारीत बसल्याची माहिती पोलीस हवालदार श्रीकांत गांगुर्डे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून  दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल आणि ५ काडतुसे मिळून आली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अब्दुल करीम सय्यद, युसूफ पठाण, श्रीकांत गांगुर्डे, महेश नाणेकर, अमित कांबळे, नामदेव गडदरे यांच्या पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन आरमळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.