Chinchwad : चिंचवड येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : चिंचवड (Chinchwad) येथील वाल्हेकरवाडी रोड येथून दोघांना चिंचवड पोलिसांनी एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह अटक केली. हि कारवाई चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि.24) हॉटेल कोल्हापुरच्या बाजूला करण्यात आला.
किरण रमेश गालफाटे (वय 22 रा. मंगळवारपेठ, पुणे) व रोहन जयदिप चव्हाण (वय 19 रा. मंगळवारपेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकऱणी पोलीस शिपाई उमेश मोहिते यांनी चिंचवड फिर्याद दिली आहे.
Pune : कंपनीची गोपनीय माहिती चोरल्या प्रकरणी एकावर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदेशीररित्या बंदूक घेऊन थांबले असताना पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 24 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यावरून चिंचवड पोलिसांनी आरोपींना अटक केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.