Talegaon News : घरातून दोन एटीएम कार्ड आणि सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – घरात ठेवलेले दोन एटीएम कार्ड आणि सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 5 एप्रिल रोजी सकाळी मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात उघडकीस आली. याबाबत 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

साहेबराव देवीदास खडसे (वय 45, रा. साळुंब्रे, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचे एटीएम कार्ड आणि मौल्यवान वस्तू घरातील कपाटात ठेवल्या होत्या. 5 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांना एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जायचे होते. त्यामुळे त्यांनी कपाटात ठेवलेले एटीएम कार्ड बघितले. मात्र त्यांना एटीएम कार्ड मिळून आले नाही. त्यांनी एटीएम कार्डचा सर्वत्र शोध घेतला मात्र एटीएम कार्ड मिळाले नाही. त्यानंतर कपाटातील अन्य साहित्याची तपासणी केली असता त्यांचे दोन एटीएम कार्ड आणि 73 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याचे उघडकीस आले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.