Chikhali : चिखली आणि भोसरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चिखली आणि भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी या दोन्ही दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या प्रकरणात राकेश रामअशिष चौरसिया (वय 25, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एच ए 8549 ही दुचाकी घरासमोर 28 डिसेंबर रोजी रात्री हॅण्डल लॉक करून पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. दुस-या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मात्र, याप्रकरणी बुधवारी (दि. 8 जानेवारी) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात अण्णाराव तम्माराया बुर्गी (वय 56, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुर्गी यांनी 4 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांची आठ हजार रुपये किमतीची एम एच 12 / झेड ए 4146 ही दुचाकी घरासमोर हॅण्डल लॉक करून तसेच चेन लॉक करून पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. 5 जानेवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.