Pune News : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दुचाकी चोरणारे चोरटे जाळ्यात, 11 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांनी चोरलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या तब्बल अकरा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आशिष सुनील बेल्हेकर (वय २८ वर्ष, रा. नारायणगाव, ता. जुन्नर जि. पुणे) आणि  पवन दत्तात्रय शेजवळ (वय ३३ रा.नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वाहन चोरीतील आरोपी आशिष बेल्हेकर हा नारायणगाव परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला नारायण गावातील बस स्टॅन्ड येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पवन शेजवळ या आरोपीच्या मदतीने नारायणगाव जुन्नर परिसरातून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल 11 दुचाकी जप्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.